परमाणु उर्जा केंद्रीय विद्यालय -1, तारापुर परमाणु ऊर्जा कनिष्ठ महाविद्यालय, तारापुर
ATOMIC ENERGY CENTRAL SCHOOL-1 TARAPUR ATOMIC ENERGY JUNIOR COLLEGE TARAPUR
परमाणु ऊर्जा विभाग का स्वायत्त निकाय, भारत सरकार परमाणु ऊर्जा विभाग का स्वायत्त निकाय, भारत सरकार
An autonomus body under Department Of Atomic Energy, Govt. Of India An autonomus body under Department Of Atomic Energy, Govt. Of India
eMail: aecstar1[at]yahoo[dot]co[dot]in Phone: (02525)26


महाराष्ट्र दिन / MAHARASHTRA DAY


दिनांक 1 मे 2025 रोजी, परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय-1/क.म. तारापूर येथे "महाराष्ट्र दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्तीथी म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. व्ही.वेणू , उपप्राचार्या श्रीमती उर्मिला लाल, मुख्याध्यापक श्री. अखिलेश गुजराती यांची होती
या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविध कार्यक्रम सादर केले, त्यामध्ये रिद्धी देशमुख हिने तिच्या भाषणातून महाराष्ट्र दिन का साजरा करतात ते सांगितले. मुलांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे सामूहिक गीत गायले. महाराष्ट्र दिनाचे महत्त्व आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास श्री.महेश बारवकर सरांनी सांगितला. प्राचार्य श्री. व्ही.वेणू , उपप्राचार्या श्रीमती उर्मिला लाल, मुख्याध्यापक श्री. अखिलेश गुजराती यांनी महाराष्ट्र दिनाबद्दल विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्क्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन रासवे सरानी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती मिळाली. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल आदर निर्माण झाला.